बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी बनला NCB चा Brand Ambassador ; ड्रग्सचे सेवन रोखण्यासाठी जनजागृती करणार

टिओडी मराठी, दि. 29 जून 2021 – बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठीची नारकॉटिक्‍स कंट्रोल ब्यूरोचा (एनसीबी) ब्रॉंड ऍम्बेसडर म्हणून निवड केली आहे. आता त्रिपाठी हा ड्रग्सविरोधात लोकांत जनजागृती करताना दिसतोय. यासाठी त्याने आपल्या आवाजातील एक संदेशही रिकॉर्ड केलाय.

दरवर्षी 26 जून रोजी या दिवशी ड्रग्सचे सेवन रोखण्यासाठी व त्याबाबत जनजागृती अभियान राबविले जाते. यासाठी त्रिपाठीने पुढाकार घेतला आहे. आता पंकज हा एनसीबीसह ड्रग्सच्या सेवनाविरोधात एक संदेश देणार आहे.

एका मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी म्हणाला, ड्रग्सच्या सेवनापासून आजच्या पिढीला रोखायचे असल्यास जनजागृती करणे गरजेचे आहे. ड्रग्सच्या आहारी जाण्यापेक्षा जीवनातील सकारात्मकरित्या पाहिले पाहिजे.

मी कायम ड्रग्सला विरोध केला आहे आणि यापुढेही विरोध करणार आहे. मला आशा आहे की देश आणि संपूर्ण जग एक दिवस ड्रग्समुक्‍त होईल आणि याबाबत सर्वांचा विजय होईल.

पंकज त्रिपाठीच्या मते, तो एक अभिनेता असल्याने हा मॅसेज अधिक लोकांपर्यत पोहचवेल. तसेच जनजागृती करण्यास निश्‍चित मदत होणार आहे. यासाठी पंकजने एक व्हिडिओ मॅसेज तयार केला आहे. यात युवा पिढीला ड्रग्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

Please follow and like us: