TOD Marathi

आयपीएलच्या (Indian premiere league ) पुढील पाच हंगामासाठी ( IPL Next Five season) म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची (IPL Broadcasting rights ) लिलाव प्रक्रिया आज पार पडली आहे . भारतीय उपखंडासाठी टिव्ही आणि डिजिटल हक्क (TV & Digital rights ) विकण्यात आले आहेत. हा व्यवहार 43 हजार कोटींमध्ये झाल्याची माहिती आता नुकतीच समोर आलीय. महत्वाचे म्हणजे, आयपीएल प्रसारण हक्क विकत घेणाऱ्या कंपनींचं नाव मात्र  समोर आलेलं नाही.  ज्या कंपनीला आयपीएल प्रसारण हक्क प्राप्त होतात, त्यांच्याच टीव्ही किंवा डिजीटल प्लॅटफॉर्मला आयपीएलचे सामने दाखवले जातात.

बीसीसीआयनं ( BCCI ) आयपीएलच्या पुढील पाच वर्षांच्या प्रसारण हक्कांसाठी कालपासून लिलाव  सुरु केला होता. या लिलावात अनेक मोठ्या कंपन्यांनी सहभाग दर्शवला होता. आयपीएल प्रसारण हक्कांसाठी डिज्नी स्टार, सोनी नेटवर्क (Sony Network) आणि रिलायन्स व्हायकॉम 18 (Relience Viacom 18) आणि झी (Zee) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. मात्र, यांपैकी कोणत्या कंपनीनं आयपीएल प्रसारण अधिकार प्राप्त केले आहेत? त्यांचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान आयपीएल प्रसारण हक्कांसाठी मागील लिलाव 2017 साली पार पडला होता. त्यावेळी स्टार इंडियानं (Star India) 2022 पर्यंत साठी प्रसारण हक्क 16 हजार 347.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याआधी 2008 मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कनं (Sony Pictures Networks) 8 हजार 200 कोटी रुपयांची बोली लावत 10 वर्षांसाठीप्रसारण हक्क मिळवले होते.