TOD Marathi

बॉलिवूड अभिनेता शक्ति कपूर (Bollywood Actor Shakti Kapoor) यांचा मुलगा आणि अभिनेता सिद्धांत कपूरला (Siddhanth Kapoor) ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे. सिद्धांत अभिनेत्री हा श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ आहे. या अटकेबद्दल अभिनेता शक्ती कपूर (Shakti kapoor) यांना विचारलं असता “हे केवळ अशक्य आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सिद्धांत कपूरला एका बंगळुरूमधल्या प्रसिद्ध हाँटेलमध्ये ड्रग्स घेताना पकडलं गेलंय. यामध्ये आणखी 6 जणांचा समावेश आहे. वैद्यकीय अहवालात ड्रग्स घेतल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान सिध्दांत कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याने काही चित्रपटात काम केलं आहे. हिंदीतल्या काही चित्रपटासांठी त्यानं सहाय्यक दिग्दर्शक (Assistent Director) म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे.

सुशांतसिंहच्या (Sushant Singh) मृत्यूनंतर अनेक चित्रपट आणि टीव्ही स्टारची ड्रग्ज प्रकरणात नावं आली होती. यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan), अनन्या पांडे (Ananya Pande), सारा आली खान (Sara Ali Khan) या स्टार किडची नावे समोर आली होती.