TOD Marathi

अडचणीचे ढग दिसले की अजित पवार (Ajit Pawar) मिस्टर इंडियासारखे गायब होतात, असा खोचक टोला भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (MP Nilesh Raje) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Deputy CM Ajit Pawar) लगावला आहे. ट्विटरवर ट्विट करत त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. (Tweet by Nilesh Rane)

निलेश राणे ट्विट मध्ये म्हणाले की, अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल.

पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार, असा टोलाही राणेंनी यावेळेस लगावला आहे.

 

दरम्यान, निलेश राणे यांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण (NCP Vidya Chavhan) यांनी उत्तर दिलं आहे. निलेश राणे कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.