TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 जुलै 2021 – इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील दुसरा टप्पा 19 सप्टेंबर 2021 पासून युएई येथे होणार आहे. आयपीएलमधील 5 वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबर रोजी तर एलिमिनेटर 11 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना 13 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2021 मध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं.

चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 5 सामने जिंकून दुसरा क्रमांक मिळवला. विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 10 गुणांसह तिसऱ्या नंबर मिळविला आहे.

तर मुंबई इंडियन्स (8), राजस्थान रॉयल्स (6), पंजाब किंग्स (6), कोलकाता नाइट रायडर्स (4) आणि सनरायझर्स हैदराबाद (2) हे संघ अनुक्रमे चौथ्या ते आठव्या क्रमांकावर आहेत.

बीसीसीआयने मागील वर्ष 2020 मधील भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता यूएईमध्ये आयपीएल स्पर्धा भरविली होती. यंदा देशातील कोरोना स्थिती सुधारल्याने ही स्पर्धा भारतात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्पर्धा सुरु असताना देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंना कोरोना विषाणूची लागण झाली. परिणामी बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित केली, तसा तो निर्णय घेतला होता.

आता पुन्हा एकदा बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसरा टप्पा 19 सप्टेंबर 2021 पासून युएईमध्ये खेळवणार आहेत.

असे आहे IPL 2021 चे वेळापत्रक :

 • 19 सप्टेंबर 2021- मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 20 सप्टेंबर 2021 – कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
 • 21 सप्टेंबर 2021 – पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 22 सप्टेंबर 2021 – दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 23 सप्टेंबर 2021 – मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
 • 24 सप्टेंबर 2021 – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
 • 25 सप्टेंबर 2021 – दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
 • 25 सप्टेंबर 2021 – सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
 • 26 सप्टेंबर 2021 – चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
 • 26 सप्टेंबर 2021 – पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 27 सप्टेंबर2021 – सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 28 सप्टेंबर 2021 – कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
 • 28 सप्टेंबर 2021 – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
 • 29 सप्टेंबर 2021 – राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 30 सप्टेंबर 2021 – सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
 • 1 ऑक्टोबर 2021 – कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 2 ऑक्टोबर 2021 – मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
 • 2 ऑक्टोबर 2021 – राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
 • 3 ऑक्टोबर 2021 – पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
 • 3 ऑक्टोबर 2021 – कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 4 ऑक्टोबर 2021 – दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 5 ऑक्टोबर 2021 – मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
 • 6 ऑक्टोबर 2021 – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
 • 7 ऑक्टोबर 2021 – चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – दुबई
 • 7 ऑक्टोबर 2021 – कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
 • 8 ऑक्टोबर 2021 – सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
 • 8 ऑक्टोबर 2021 – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 10 ऑक्टोबर 2021 – क्वालिफायर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
 • 11 ऑक्टोबर 2021 – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
 • 13 ऑक्टोबर 2021 – क्वालिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
 • 15 ऑक्टोबर2021 – अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई.