TOD Marathi

टिओडी मराठी, टोकियो, दि. 26 जुलै 2021 – भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. कोलोंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर उभय संघांत पहिला टी-20 सामना खेळवला.

या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 38 धावांनी मात केली. अगोदर सूर्यकुमार यादवचे अर्धशतक (50) आणि कर्णधार शिखर धवनच्या 46 धावांच्या खेळीवर भारताने श्रीलंकेसमोर 165 धावांचे आव्हान उभं केलं होतं.

परंतु हे आव्हान श्रीलंकेच्या फलंदाजांना पेलवलं नाही. कारण, भुवनेश्वर कुमारसह सर्वच गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली आणि श्रीलंकेच्या फलंदाजांना केवळ 126 धावांत रोखलं. त्यामुळे 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली.