Petrol परवडत नसेल तर सायकल वापरा, पैसे कोणाच्याही घरात जात नाहीत – मंत्री प्रद्युम्नसिंग तोमर

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 4 जुलै 2021 – भाजी आणायला मंडईमध्ये जाताना सायकल वापरा, इंधनाच्या दरवाढीमुळे सामान्य माणसांना अजिबात फटका बसणार नाही. उलट वाढीव किमतीतून जो पैसा मिळतील. ते गरिबांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी खर्च होईल, अशी वक्तव्ये विविध राज्यांतील भाजप नेते सध्या करत आहेत. काही राज्यांत पेट्रोलचे भाव प्रतिलीटर १०० रुपयांवर गेलेत. पण, त्याबद्दल नाराजीचा एकही शब्द भाजप नेते काढत नाहीत. उलट सायकल वापरण्याचा सल्ला देत आहेत.

मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनी लोकांना असा अजब सल्ला दिला आहे. ते म्हणतात, मंडईत भाजी आणायला जाताना सायकल वापरा. त्याने प्रकृतीही उत्तम राहील आणि प्रदूषणही होणार नाही.

तेल दरवाढीतून जो पैसा मिळणार आहे, त्यातून गरीब लोकांना दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देता येईल. भाजपच्या नेत्यांनी याअगोदर अशीच वादग्रस्त वक्तव्ये केलीत.

फेब्रुवारी महिन्यात बिहारचे मंत्री आणि भाजप नेते नारायण प्रसाद म्हणाले होते की, इंधन तेलाच्या दरवाढीचा सामान्य माणसाला अजिबात फटका बसणार नाही. कारण, ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. अगदी थोडेच लोक खासगी वाहन वापरतात. तेलाच्या वाढलेल्या किमतींची लोकांना सवय होईल.

तर काही दिवसांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हंटलं होत कि, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान या राज्यांत काँग्रेस सत्तेत आहे किंवा सत्ताधारी आघाडीत सामील आहे.

त्या राज्यांतही पेट्रोल, डिझेलच्या किमती जास्त का आहेत?. याचे उत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले पाहिजे. त्यांना गरिबांची इतकी कणव आहे, तर मग महाराष्ट्रात इंधन तेलावरील कर कमी करण्यास राहुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगावे.

कर्नाटक, मध्य प्रदेशमध्येही तेलाचे दर अधिक आहेत. याबाबत मात्र, प्रधान यांनी मौन बाळगले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरांनुसार देशात इंधन तेलाच्या दरात चढउतार होत असतात. तेलाच्या किमती वाढल्या तरी त्यातून मिळणारे पैसे कोणीही घरी घेऊन जात नाही, असे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले होते.

Please follow and like us: