TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 23 ऑगस्ट 2021 – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज, सोमवारी (दि.23) पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातील येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज (डीआयएटी) आणि आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांना ते भेट देणार आहेत.

‘डीआयएटी’ येथील सर्वसाधारण सभेमध्ये राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. त्यासह याठिकाणी नवीन इमारतीचे उद्‌घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हेही उपस्थित असतील. घोरपडी मधील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) येथील स्टेडियमचे नाव बदलून नीरज चोप्रा आर्मी स्पोर्टस स्टेडियम असे नामकरण करणार आहेत.

पुण्यातील या सोहळ्यास राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्व सशस्त्र दलाचे जवान यांचा सिंह यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. भालाफेक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्यासह अन्य स्पर्धक यावेळी उपस्थित राहणार आहेत.