TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 12 ऑगस्ट 2021 – कोरोना काळात सन 2022 या वर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबद्दल कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिलेत.

शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली सन 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10 आणि 12 वी च्या परीक्षा कार्यपद्धती ठरविण्याबाबत इथल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये बैठक पार पडली.

महाराष्ट्र राज्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर एक नवीन ‘शैक्षणिक चॅनेल’ तयार करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा करणार आहे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री कडू यांनी सांगितले आहे.

यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री कडू म्हणाले, कोरोना संसर्ग काळात परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येईल?. तसेच कोरोना संसर्ग नसेल तर परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येणार आहे. याबाबत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी दिलेत.

इयत्ता 10 आणि 12 वी च्या परीक्षेबाबत विद्यार्थी व पालक यांना लवकरात लवकर कळविल्यास परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाची तयारी करण्यास सोयीचे होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने आपापली मते मांडली.