TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2021 –  संसदमध्ये सरकारने विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. विरोधी पक्षांचे बोलणं सरकारने ऐकून घेतलं नाही. विरोधक विरोध करताना सभापतींना घेराव घालत असतात. पण, हे करताना विरोधी पक्षांच्या महिला खासदारांना जो त्रास दिला गेला हे दुर्देवी आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

सध्या पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यामुळे वादळी ठरलं. पेगॅसस, कृषी कायदे, आरक्षण विधेयक, विमा व्यवसाय दुरूस्ती विधेयक यावर प्रचंड चर्चा झालीय.

संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहाच्या माध्यमातून देशाला सामाजिक न्यायाची आणि विकासाची नवी सुरूवात मिळत असते.

मात्र, माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आज जे राज्यसभेत घडलं, असे कधीही झालं नव्हतं. बाहेरून 40 हून अधीक महिला व पुरूष बोलवले. त्यांच्या मार्फत महिला खासदारांसोबत गैरवर्तन केलं, हे वाईट आहे. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर विमा दुरूस्ती विधेयक पटलावर ठेवलं गेलंय, यावर चर्चा करत असताना हा गैरप्रकार घडलाय. काॅंग्रेस, आप, शिवसेना आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात यावं, यावरून सभापतींना घेरलं. पण, एवढ्या गोंधळामध्ये सुद्धा सरकारने हे विधेयक मंजूर केलं.