TOD Marathi

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ‘भारत जोडो’ यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहे. (bharat Jodo Yatra in leadership of Rahul Gandhi) नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ही यात्रा 7 नोव्हेंबरला दाखल होईल. या यात्रेच्या अनुषंगाने सर्व तयारी झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीसह जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामीण भागातही जनजागृती केली जात आहे. (Awareness programs are being taken for Bharat Jodo Yatra by Congress party) महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यात्रेत काँग्रेस नेते तर सहभागी होणारच आहेत मात्र त्यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. (Leaders of other parties are participating in Bharat Jodo Yatra)

कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामधून प्रवास करत आहे. यात्रेच्या महाराष्ट्रातील कार्यक्रमाबद्दल माहिती देताना अशोक चव्हाण म्हणाले की, यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार 8 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे मुक्कामी असतील आणि 9 नोव्हेंबर रोजी ते नायगाव येथून यात्रेत सहभागी होतील. सोबतच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर हेही नेते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सर्वाधिक प्रवास नांदेड जिल्ह्यातून करणार आहे. 120 किलोमीटर प्रवास नांदेड जिल्ह्यात असणार आहे. जवळपास 382 किलोमीटर प्रवास हा महाराष्ट्रातून असणार आहे. महाराष्ट्रात दोन मोठ्या सभा देखील या यात्रेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात भारत जोडो यात्र पाच जिल्ह्यांमधून प्रवास करेल. यामध्ये नांदेडसह हिंगोली, वाशिम अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेड आणि शेगाव या दोन ठिकाणी राहुल गांधी यांची जाहीर सभा देखील होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण केल्यानंतर ही यात्रा मध्यप्रदेशकडे रवाना होईल. दरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत एवढा लांब प्रवास करण्यासाठी काँग्रेस नेत्यांकडून विशेष तयारी करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेते रोज सकाळी विशेष वर्कआउट करताना दिसत आहेत. एकंदरीत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपूर्वी काँग्रेस पुन्हा एकदा तयार होताना दिसत आहे.