TOD Marathi

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ५७ व्या वाढदिवसाच्या खास निमित्त त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे (On the special occasion of Bollywood King Shah Rukh Khan’s 57th birthday, the trailer of his upcoming film ‘Pathan’ has been released). पठाण चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर शाहरुख खानचे चाहते खूप उत्सुक दिसत आहेत, त्यामुळेच पठाण चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

‘पठाण’ (Pathan) चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख खानचा ॲक्शन अवतार पाहायला मिळत आहे. एकीकडे टीझरमध्ये शाहरुख (Shah Rukh Khan) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यात अ‍ॅक्शन दिसत असतानाच दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ग्लॅमरस लूकही पाहायला मिळत आहे. ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. शाहरुख आणि दीपिकाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


शाहरुख खानचा बॉलीवूड चित्रपटांमधून चार वर्षांचा ब्रेक ‘पठाण’ चित्रपटाने संपणार आहे. शाहरुख खान शेवटचा ‘झिरो’ चित्रपटात अनुष्का शर्मासोबत दिसला होता, ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट एक पठाण स्पाय-थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये शाहरुख-दीपिकासोबत जॉन अब्राहमची अॅक्शन करताना दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे.