TOD Marathi

बॉलिवूडमधील नेपोटीजमबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर होत असते. गेली काही वर्षं याबद्दल बरंच काही बोललं आणि लिहिलं गेलं आहे. सोशल मीडियावर सतत या स्टारकिड्सवर टीका होताना आपण पाहतो.

काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं (A few months ago, Aryan Khan, son of Shahrukh Khan, was arrested). ड्रग्स प्रकरणात अडकल्याने त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती. शाहरुख खानवरही वैयक्तिक टीका होत होती.
२५ वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य करणाऱ्या शाहरुख खानचे संपूर्ण जगभरात करोडो चाहते आहेत. शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान बॉलिवूड पदार्पणसाठी सज्ज झाला असून सोशल मीडियावर याबाबत त्याने माहिती दिली आहे. शाहरुखच्या प्रोडक्शन हाऊसमधूनच आर्यन डेब्यू करत आहे (Shahrukh’s son Aryan Khan is all set to make his Bollywood debut and he has given information about it on social media. Aryan is making his debut from Shahrukh’s production house).

आता खुद्द आर्यन खानने या गोष्टीची पुष्टी केली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने एक फोटो पोस्ट करत याबद्दल खुलासा केला आहे (He disclosed this by posting a photo on his social media account). लोकप्रिय इस्राईली वेबसीरिज ‘फौदा’चा अभिनेता आणि निर्माता लिओर राज याने आर्यनला यासाठी प्रशिक्षण दिल्याची चर्चा होत होती. आपल्याच वडिलांच्या प्रोडक्शन कंपनीच्या प्रोजेक्टमधून आर्यन खान अभिनेता म्हणून नव्हे तर लेखक म्हणून लोकांच्या समोर येणार आहे.

ही पोस्ट शेअर करत आर्यनने लिहिलं, “लिखाणाचे काम पूर्ण झाले आहे आता शूटिंगसाठी उत्सुक आहे.” आर्यन ज्या वेबसिरीजचं काम करतोय त्याचं लिखाण आणि दिग्दर्शनही तोच करणार असल्याची चर्चा आहे. आई गैरी खान हिनेदेखील या पोस्टवर कॉमेंट करत आर्यनला शुभेच्छा दिल्या. शाहरुखनेही याआधी कित्येक मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता, ‘मुंबई मिरर’शी संवाद साधताना त्याने सांगितलं होतं की “आर्यनला अभिनयात नाही तर दिग्दर्शन आणि लिखाणात रुची आहे.”

आर्यनने परदेशातून फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतले आहे. लवकरच एक स्टारकीड आपल्याला एका लेखकाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. शाहरुखची मुलगी सुहाना ही झोया अख्तरच्या वेबसीरिजमधून पदार्पण करणार आहे. सुहानाने अभिनयात करियर करायचं निश्चित केलं आहे. लवकरच तिची आगामी सिरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.