TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 12 ऑगस्ट 2021 – गुजरातमध्ये एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती भारतीय जनता पक्षाचे खासदार परबत पटेल असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे इथले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या व्हिडिओचा फोटो दाखवून आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने दावा केला की, तो 15 ऑगस्टला संपूर्ण व्हिडिओ समोर आणणार आहे. मात्र, त्याअगोदर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

खासदार परबत पटेल यांनी हा व्हिडीओद्वारे षड्यंत्र केलं जात आहे, असे सांगितले आहे. त्यांच्या मुलाने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केलीय. या प्रकारामुळे गुजरातमधील राजकारणात एकच चर्चा होत आहे.

बनासकांठाचे आम आदमी पक्षाचे नेते माधाभाई पटेल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी एक फोटो शेअर केला होता. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले होते की खासदार परबत पटेल पालनपूरच्या शासकीय अतिथीगृहामध्ये अश्लिल चाळे करताना पकडले आहेत.

या भाजप नेत्याचा संपूर्ण व्हिडिओ १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करणार आहे. मात्र त्याअगोदर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

खासदार परबत पटेल या संदर्भात बाजू मांडताना म्हणाले, व्हिडिओबद्दल आपल्याला अधिक माहिती नाही. आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्याच्या हेतूने कोणत्यातरी व्हिडिओशी छेडछाड करून तयार केला आहे. ‘मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतेही वाईट काम केलं नाही. माझा फोटो एडिट करून तेथे लावला आहे.

पोलिसांनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या एकाला अटक केली आहे, असे बनासकांठाचे पोलीस उपअधीक्षक पी एस चौधरी यांनी सांगितले आहे.