TOD Marathi

Airport Authority of India मध्ये नोकरीची संधी ; अशी होणार नियुक्ती

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2021 – एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सीनियर असिस्टंट या पदासाठी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून अर्ज मागविण्यात आलेत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट अशी निश्चित केली आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. अर्ज दाखल करण्यापूर्वी भरती प्रक्रियेचे नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे, असे आवाहन देखील एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने केलं आहे.

एकूण 29 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. अर्ज दाखल करण्यास उशीर न करता पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करणे गरजेचं आहे.

अर्ज करण्याची सुरुवातीची दिनांक – 29 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 31 ऑगस्ट 2021

भरतीच्या जागा –

  • सीनियर असिस्टंट (ऑपरेशन्स) – 14 जागा
  • सीनियर असिस्टंट (वित्त) – 6 जागा
  • सीनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) – 9 जागा

आवश्यक पात्रता –

  • – सीनियर असिस्टंट ऑपरेशनसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. त्याच्याकडे एलएमव्ही प्रकारातील लायसन्स असावे. त्यासह त्याचा डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा कोर्स झालेला असावा.
  • – सीनियर असिस्टंट वित्त या पदासाठी उमेदवार हा बी.कॉम. पदवीधारक असावा. त्याचा संगणकाचा तीन ते सहा महिन्याचा प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा.
  • – सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदावर अर्ज करणारा उमेदवार हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ इंजिनिअरिंगमधील उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा –
तिन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षे निश्चित केली आहे.

एवढा असेल पगार –
सीनियर असिस्टंट ऑपरेशन्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
सीनियर असिस्टंट वित्त : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार

अधिकृत वेबसाईट https://www.aai.aero/en ; किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.