TOD Marathi

टिओडी मराठी, न्यूयॉर्क, दि. 12 ऑगस्ट 2021 – फोर्ब्सच्या यादीत भारतीय वंशाच्या 5 महिलांनी स्थान पटकावले आहे. ‘अमेरिकाज रिचेस्ट सेल्फ मेड वुमेन’च्या 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीत या भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश केला आहे.

यंदा फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत नवीन 15 जणांचा समावेश झालाय. त्यात पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी इंद्रा नूयी, अरिस्टा नेटवर्कच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी जयश्री उल्लाल, सिंटेलच्या सहसंस्थापिका नीरजा सेठी, कॉन्फ्लुएंटच्या सहसंस्थापिका आणि माजी मुख्य टेक्‍नोलॉजी अधिकारी नेहा नारखेडे आणि गिंको ब्लोवर्क्‍सच्या सहसंस्थापिका रेश्‍मा शेट्टी यांचा समावेश केला आहे.

लंडन देशात जन्मलेल्या 60 वर्षीय जयश्री उल्लाल या 2008 पासून एरिस्टा नेटवर्क या संगणक नेटवर्किंग फर्मच्या प्रमुख आहेत. उल्लाल यांचे बालपण भारतात गेले असून त्यांची संपत्ती 1.7 अब्ज डॉलर इतकी आहे आणि फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये त्या 16 व्या स्थानावर आहेत.

नीरजा सेठी यांची संपत्ती 1 अब्ज डॉलर इतकी असून त्यांचा फोर्ब्सच्या यादीतील क्रमांक 26 वा आहे. पती भारत देसाई यांच्याबरोबर मिळून त्यांनी मिशिगनमधील आपल्या अपार्टमेंटमध्ये सिंटेलची स्शापना केली होती.

मूळच्या पुण्यातील असलेल्या नेहा नारखेडे यांची संपत्ती 925 दशलक्ष डॉलर आहे आणि त्या या यादीत 29 व्या क्रमांकावर आहेत.

अपाचे काफ्का हे मेसेजिंग सॉफ्टवेअर त्यांनी विकसित करून 2014 मध्ये त्यांनी कॉन्फ्लुएंटची स्थापना केली आहे. रेश्‍मा शेट्टी यांची संपत्ती 750 दशलक्ष डॉलर आहे आणि त्या या यादीत 39 व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी इंजिनिअरिंगमधून पी.एचडी मिळवून गिंको ब्लोवर्क्‍सची स्थापना केलीय.