TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 20 जून 2021 – भारतीयांनी स्विस बँकेत जमा केलेली रक्कम सुमारे 20 हजार कोटींच्या पुढे गेलीय. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बॅंकेने नुकतीच जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार सन 2020 मध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांनी स्विस बँकेत सुमारे 20,700 कोटी रुपये जमा केलेत. ही आकडेवारी अधिकृत असून याचा काळ्या पैशाशी संबंध नाही, असे देखील बॅंकेने स्पष्ट केले आहे.

एकीकडे खासगी बॅंक खात्यात जमा केलेली रक्कम खाली आली असताना वित्तीय संस्था आणि कंपन्यांनी सिक्‍युरिटीज व इतर मार्गांनी बरीच रक्कम जमा केलीय.

स्विस नॅशनल बॅंक (एसएनबी) च्या आकडेवारीनुसार, 2019 च्या अखेरीस भारतीयांच्या ठेवींची संख्या 6,625 कोटी इतकी होती. सर्वाधिक 13 हजार 500 कोटी रुपये बॉंड, सुरक्षा ठेव आणि इतर माध्यमांद्वारे गुंतविले आहेत.

बॅंकेच्या माहितीनुसार, याअगोदर 2006 मध्ये भारतीय ठेवींनी 6.5 अब्ज स्विस फ्रॅंकची विक्रमी नोंद गाठली होती. परंतु त्यानंतर 2011, 2013 आणि 2017 वगळता भारतीयांनी स्विस बँकेत पैसे जमा करण्यात फारसा रस दाखलेला नाही. परंतु 2020 ने जमा रक्कमेचा सर्व आकड्यांचे रेकॉर्ड मोडलेत.

2020 मध्ये जेथे खासगी ग्राहकांच्या खात्यामध्ये भारतीय ठेवींमध्ये सुमारे 4000 कोटी रुपये होते, तर इतर बॅंकांमार्फत 3100 कोटी रुपये जमा झालेत. तसेच सर्वाधिक 13 हजार 500 कोटी रुपये बॉंड, सुरक्षा ठेव आणि इतर माध्यमांद्वारे गुंतविले आहेत. ही आकडेवारी अधिकृत असून काळ्या पैशाशी या आकडेवारीचा संबंध नाही, असे देखील बॅंकेने स्पष्ट केले आहे.