TOD Marathi

टिओडी मराठी,नवी दिल्ली, दि. 22 ऑगस्ट 2021 – नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीने विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे त्यांच्याकडे पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प तंत्रज्ञ, संशोधक आदी पदांवर भरती प्रक्रिया होणार आहे.

एकूण 237 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी बी.टेक, एम.एससी आणि दहावी पास असे उमेदवार यातील विविध पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यासाठी पात्र उमेदवारांनी एनआयओटीच्या वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती घ्यावी.

नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीने त्यांच्या वेबसाईटवर यासंदर्भात सविस्तर नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार https://www.niot.res.in/niot1/recruitment.php या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 20 ऑगस्टपासून सुरुवात झाली असून अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक 13 सप्टेंबर अशी आहे.

भरतीची पदे –
प्रकल्प शास्त्रज्ञ 04, प्रकल्प शास्त्रज्ञ ग्रेडII 30 पदे , प्रोजेक्ट सांयटिस्ट ग्रेड 1 या पदावर 73 पदांवर भरती होणार आहे. प्रकल्प सहायक या पदासाठी 64 पद ठेवली आहेत. प्रोजेक्ट तंत्रज्ञ पदासाठी 28, प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट 25, रिसर्च असोसिएट 3, सिनियर रिसर्च फेलोसाठी 8 तर ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी 2 पदांवर भरती होणार आहे.

तर, या पदांसाठी पदनिहाय मानधन दिलं जाणार असून 17 हजारांपासून 78 हजारांपर्यंत वेतन दिलं जाईल. पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित केली आहे. आरक्षणाच्या नियमाप्रमाणं राखीव जागांवरील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देणार आहे.

अशी आहे निवड प्रक्रिया –
नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीतर्फे प्रोजेक्ट सांयटिस्ट आणि रिसर्च फेलो या पदासांठीची उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तर, इतर पदासांठी लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. त्यातून उमेदवारांची निवड होईल. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड ही कंत्राटी तत्वावर केली जाणार आहे.

अर्ज असा दाखल करा –
स्टेप 1: नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीच्या वेबसाईटला भेट द्यावी आणि संपूर्ण माहिती घ्यावी.
स्टेप 2: भरती म्हणजेच Recruitment लिंकवर क्लिक करावे.
स्टेप 3: वेबसाईटवरील दिलेल्या सूचना वाचून अर्ज दाखल करावा.
स्टेप 4: अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट सोबत ठेवावी.
स्टेप 5: एनआयओटीच्या पुढील अपडेटससाठी वेबसाईटला भेट देत राहावे.