TOD Marathi

गोकुळ दूध संघाची (Gokul Milk Federation general meeting) वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. ही सर्वसाधारण सभा सुरू होण्याआधीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. शौमिका महाडिक (Shaumika Mahadik Kolhapur) आणि महाडिक गटाचे सभासद येण्यापूर्वीच सभागृह संपूर्ण भरलेले होते. त्यामुळे त्यांना पुढे बसण्यासाठी जागा मिळाली नाही आणि यानंतर गोकुळच्या सभेत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

या सभेला सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील (Satej Patil, Hasan Mushrif, Ruturaj Patil present in Gokul general meeting) हे देखील उपस्थित आहेत. ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. जिल्ह्यातील दूध संकलन सांगा, अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केली आहे. दूध संकलनात घट आहे असे सांगण्यात येत आहे मात्र आधी आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावीत, असे देखील शौमिका महाडिक म्हणाल्या.