TOD Marathi

टिओडी मराठी, चंडीगढ, दि. 10 जुलै 2021 – पंजाबचे माजी मंत्री अनिल जोशी यांची शनिवारी भाजपमधून हकालपट्टी केली आहे. अनिल जोशी यांना काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रदेश शाखेने पक्षविरोधी कारवायांबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला अनिल जोशी यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

अनिल जोशी यांनी पक्षविरोधी भूमिका कायम ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे प्रदेश शाखेकडून सांगण्यात आले आहे. अवघ्या सहा-तास महिन्यांवर पंजाब विधानसभेची निवडणूक आली आहे.

अशात प्रदेश भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, असे अनिल जोशी यांच्यावरील कारवाईतून स्पष्ट झालं आहे. आता अनिल जोशी यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता आहे.

भाजपमध्ये पक्ष, धोरण याकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. तसेच भाजपमध्ये सामील झाल्यानंतर स्वतःची विचारसरणी बाजूला ठेवून पक्षाची विचारसरणी पूर्णतः स्वीकारायची का? प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि ते त्यानं जपलं पाहिजे.

याचा पुरस्कार भाजप करत आहे का? भाजपच्या काही बाबींना जर विरोध केला तर तो दोषी ठरू शकतो का? असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत.