TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 जुलै 2021 – राज्याचे माजी मंत्री आणि माजी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कृपाशंकर सिंह यांनी सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. आपण भाजपमध्ये दाखल होणार आहे, असे संकेत त्यांनी खूप अगोदर दिले होते.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

तसेच त्यांच्यावर उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचाही आरोप केला जात आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते. आता त्याच पक्षात ते प्रवेश करत आहेत.