TOD Marathi

जयपूर : 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे. (Bharat Jodo Yatra in Madhya Pradesh now) तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधील प्रवास पूर्ण करुन भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. मध्य प्रदेशातील यात्रेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. (Bharat Jodo Yatra to enter in Rajasthan after Madhya Pradesh) राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसची चिंता वाढली होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. मात्र, आज राज्यस्थानात जे घडलं त्यामुळं काँग्रेस आणि राहुल गांधी यांची चिंता नक्कीच कमी झाली आहे.

भारत जोडो यात्रा राजस्थानात प्रवेश करण्यापूर्वी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट एकत्र आले आहेत. (Ashok Gehlot and Sachin Pilot came together) काही दिवसांपूर्वी अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना गद्दार म्हटलं होतं. अशोक गेहलोत यांनी देश महागाई आणि बेरोजगारीसोबत लढत आहे. राहुल गांधी हे देशाला शांततेचा संदेश देत आहेत. देशात वाढलेला तणाव कमी करण्याची गरज आहे. राहुल गांधी यांचा संदेश देशानं स्वीकारल्याचं गेहलोत म्हणाले. भाजप भारत जोडो यात्रेला घाबरत असल्याचंही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले. यात्रेविरुद्ध भाजप लोकांना भडकवण्याचं काम करत असल्याचं गेहलोत म्हणाले. राजस्थानमध्ये सर्व जण एक आहेत. आम्ही दोघेही एकत्र आहोत, ही काँग्रेस पक्षाची खासियत आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या संदेशानंतर आम्ही दोघे एकत्र आल्याचं अशोक गेहलोत म्हणाले.

राजस्थानात भारत जोडो यात्रा यशस्वी होईल. भारत जोडो यात्रेवर आम्ही विस्तारानं चर्चा केली आहे. भारत जोडो यात्रेमुळं देशभर उत्साहाचं वातावरण आहे. राजस्थानमध्ये भारत जोडो प्रचंड यशस्वी होईल, असं सचिन पायलट म्हणाले. भारत जोडो यात्रा राजस्थानात ५ डिसेंबरला प्रवेश करणार आहे. त्यापूर्वीच अशोक गेहलोत आणि सचिन पायलट मतभेद विसरुन एकत्र आले आहेत. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी राजस्थानातील प्रमुख नेते एकत्र आणले आहेत. भारत जोडोची तयारी चांगल्या प्रकारे करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देत आहे. राजस्थानात भारत जोडो यात्रा चांगल्या प्रकारे पार पडेल, असं गेहलोत आणि पायलट यांनी सांगितल्याचं वेणुगोपाल म्हणाले. आम्ही राजस्थानात पुन्हा निवडणूक जिंकू असंही के. सी. वेणुगोपाल म्हणाले.