Google च्या ‘अँड्राईड 12 OS व्हर्जन’मध्ये बग शोधा अन मिळवा 7 कोटीचे बक्षीस

टिओडी मराठी, दि. 28 मे 2021 – गुगलने नुकतेच अँड्राईड १२ ओएस व्हर्जन रिलीज केलं आहे. मात्र, अँड्राईड ओएसमध्ये अनेकदा बग मिळाले आहेत. त्यामुळे गुगलने बग शोधण्यासाठी बाउंटी प्रोग्राम चालविला आहे.

या प्रोग्रामनुसार विविध सिस्टीममध्ये बग शोधणाऱ्याना विविध रकमेची बक्षिसे जाहीर केलीत. गुगलसह सर्वच टेक कंपन्या अशा प्रकारे बग शोधण्यासाठी बाउंटी प्रोग्राम चालवितात.

गुगलने एओएसपी कोड बग, ओईएम कोड, कर्नेल, सिक्युअर इलेमेंट कोड, ट्रस्ट झोन ओएस, मोड्युलससाठी ही बक्षिसे जाहीर केलीत. १८ मे ते १८ जून 2021 दरम्यान ‘अँड्राईड बग’ शोधणाऱ्यास ५० टक्के बोनस दिला जाणार आहे.

अशी आहेत बक्षिसे :
फोनच्या लॉक स्क्रीनला बायपास केल्यास १ लाख डॉलर्स, ‘पिक्सल टायटन बग’साठी १ लाख डॉलर्स, सिक्युअर इलेमेंट, कर्नेल व ट्रस्टेड एग्झीक्युटीव्हसाठी प्रत्येकी अडीच लाख डॉलर्स, प्रीविलेज्ड प्रोसेस साठी १ लाख डॉलर्स अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. गुगलचे अँड्राईड बीटा व्हर्जन सध्या काही युजर्ससाठी उपलब्ध आहे. सर्वांसाठी स्टेबल व्हर्जन या वर्षअखेर येणार आहे.

Please follow and like us: