TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 16 जून 2021 – सध्याच्या इंटरनेटच्या महाजालात अनेकप्रकारचे हल्ले होत आहेत. डेटा चोरून त्याचा चांगला- वाईट वापर करण्यावर भर दिला जात आहे. इंटरनेटचा मालक कोणीही नाही. ज्याच्या हातात इंटरनेट तोच मालक अशी समजूत आहे. त्यामुळे नवनवीन पद्धतीने युक्ती लढवून माहिती गोळा करण्यासाठी फिशिंग केले जाते. अशाप्रकारे गुगलच्या जी-मेलवर सुमारे 10 कोटी ‘फिशिंग’ हल्ले होत असतात, अशी माहिती गुगलने दिली आहे. हे हल्ले रोखण्याचा प्रयत्न गुगल करत आहे.

इंटरनेटचा वापर म्हटलं की, सायबर सुरक्षेचा विषय आला. इंटरनेट युजर्सला ‘फिशिंग’सारख्या (नवी वेबसाईट) सायबर हल्ल्याला तोंड द्यावे लागते. अशात दररोज 10 कोटी युजर्सच्या जी-मेल अकाऊंटवर होणारे ‘फिशिंग’ हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा दावा गुगल कंपनीने केला आहे. याशिवाय 100 अब्ज ऍप्सवरील मालवेयर स्कॅन करतो, असेही गुगलने म्हटलंय आहे.

गुगलची जी-मेल सेवा जगभरात वापरली जात आहे. जी-मेल युजर्सला ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे, अशी माहिती गुगलने दिली आहे.

सायबर हल्ल्यांचा फटका पर्सनल युजर, प्रायव्हेट व सरकारी सेक्टर अशा सर्वांना बसलेला आहे. त्यामुळे गुगल कंपनीने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने स्वत:मधील उणिका शोधून त्यावर काम करायला सुरुवात केली आहे, असे ग्लोबल अफेअरचे वरिष्ठ अधिकारी केंट वाॅकर यांनी सांगितले आहे.