TOD Marathi

किती बोलतो आपण?; आपण दिवसाला 7 हजार शब्द!, LinkedIn instructor Jeff Ncell ची माहिती

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 16 जून 2021 – आपण किती बोलतो? याच नीट निरीक्षण केलं आहे का? कधी विचार केला आहे का? दिवसभरात आपण किती शब्द उच्चारतो? . पण, लिंक्डईन इन्स्ट्रक्टर जेफ एनसेल यांच्या मते साधारणपणे एक व्यक्ती दिवसाला कमीत कमी सात हजार शब्द बोलते… कदाचित त्याहूनही जास्त शब्द बोलते. थक्क झालात ना..? होय, आपण ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे 20 खंड 14.5 वेळा वाचण्यासारखे बोलतो.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण खूप बोलत असतो. आपलं बोलणं कधी संपत नाही. कुणी कमी बोलतं?, कुणी जास्त. शब्दांची ताकद सारे जाणतो. पण कधी विचार केलाय का?, आपण दिवसाला किती शब्द बोलतो?.

लिंक्डईन इन्स्ट्रक्टर जेफ एनसेल यांच्या मते साधारणपणे एक व्यक्ती दिवसाला कमीत कमी सात हजार शब्द बोलते.

आपण आयुष्यभरात एकूण किती शब्द बोलतो? विचार करा. पण, याचे उत्तरही शोधण्यात आलंय. एखादी व्यक्ती आयुष्यात सरासरी 86 कोटी तीन लाख 41 हजार 500 शब्द बोलते, असा अंदाज वर्तविला आहे. म्हणजे सुमारे 86 कोटी शब्द बोलण्यात आपण आपलं आयुष्य खर्ची घालतोय.

ब्रिटिश लेखक आणि ब्रॉडकास्टार गेल्स ब्रॅन्ड्रेथ यांनी ‘जॉय ऑफ लेक्स’ या पुस्तकात याची माहिती दिलीय. आयुष्यभरात एवढे शब्द बोलणे म्हणजे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे 20 खंड 14.5 वेळा वाचण्यासारखे आहे.