TOD Marathi

पुण्यात Ambulance चे दर निश्चित; ज्यादा पैसे घेतल्यास होणार कडक कारवाई, ‘त्या’ काळाबाजाराला आळा बसणार

टिओडी मराठी, पुणे, दि. 28 मे 2021 – पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित केले आहेत. जर कोणी ज्यादा पैसे घेतल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. यातील काळाबाजार रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) रुग्णवाहिकांचे नवे दर नुकतेच निश्चित केलेत. ठरवून दिलेल्या दरापेक्षा आगाऊ पैसे आकरल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आरटीओ प्रशासनाकडून दिला आहे.

देशात कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे. अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतर जाण्यासाठीही रुग्णवाहिकांकडून हजारो रुपये आकारले जाताहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका चालकाकडून अधिक पैसे आकारल्याच्या अनेक घटना याअगोदर उघडकीस आल्यात.

रुग्णवाहिकांचे नवे दर शहरातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी फ्लेक्सच्या स्वरूपात रुग्णालयाच्या आवारात लावावेत, असा आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी दिलाय.

हे फ्लेक्स नागरिकांना सहज दिसतील, अशा ठिकाणी लावण्याची अट देखील आरटीओने घातली आहे. त्यासह ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक आकारणी केल्यास नागरिकांनी  rto.12-mh@gov.in किंवा homebranchpune@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केलं आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, रुग्णवाहिकांना पहिल्या दोन तासांसाठी अथवा 25 किमी अंतरासाठी रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार, 600 ते 950 रुपये दर निश्चित केला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 12, 13 किंवा 14 रुपये आकारावेत, असा आदेश आरटीओकडून दिला आहे.

त्यासह रुग्णाला घेऊन जाण्यापूर्वी प्रतीक्षा करावी लागली तर, प्रतीक्षा शुल्क म्हणून प्रतीतास 100, 125 आणि 150 रुपये असे दर निश्चित केले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील आरटीओकडून दिला आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज