TOD Marathi

Paytm देशातील सर्वात मोठा IPO आणणार?; गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ एक सुवर्णसंधी

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 28 मे 2021 – आता देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असलेली पेटीएम करत आहे. त्याआधारे पेटीएमकडून प्रायमरी मार्केटमधून 21,800 कोटी रुपये उभारण्याची तयारी करण्यात येत आहे, त्यामुळे देशातील गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, असे सांगण्यात येत आहे.

याबाबत ब्लुमबर्गच्या माहितीनुसार, पेटीएमची पेरेंट कंपनी असलेल्या ‘वन 97’ कम्युनिकेशनची आज बोर्ड मीटिंग आहे, या मीटिंगमध्ये आयपीओचा हा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली आहे.

सुमारे 21,800 कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार आहे. पेटीएमचा हा आयपीओ यंदाच्या नोव्हेंबरपर्यंत सुरु होणार आहे. पेटीएम कंपनीची मार्केट व्हॅल्यू सध्या 16 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

2020 साली पेटीएम कंपनीची 3280 कोटी रुपये इतकी कमाई होती. त्यामध्ये यंदा घट होऊन ती 2942 कोटी रुपयांवर आलीय. पेटीएमची भारतीय मार्केटमध्ये स्पर्धा ही PhonePe, Google Pay, Amazon Pay आणि Whatsapp Pay यांच्याशी आहे.

भारतात पेटीएमकडे दोन कोटींहून अधिक मर्चंट्स पार्टनर्स आहेत. ग्राहकांकडून महिन्याला सुमारे 1.4 अब्ज रुपयांचे ट्रान्जेक्शन केले जाते.