TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 28 मे 2021 – कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कशी आणि केव्हा होणार? याची चिंता लागली होती. विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी म्हणून न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. त्यामुळे परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दूर केला आहे. त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसं होणार हे सांगितले आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी आणि पालकांमधील संभ्रम दूर केला आहे.

हायकोर्टाने दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या मुद्द्यावरुन सरकारला खडसावलं होतं. गायकवाड यांनी याअगोदर ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही, असे म्हटलं होतं.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे गायकवाड म्हणाल्या होत्या. त्यामुळे शिक्षणमंत्री नेमका काय निर्णय घेतात? याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली होती.

असा आहे दहावीच्या निकालाचा पॅटर्न :
– दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयांचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार.

-10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन : 30 गुण

– गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारे 20 गुण देणार

– नववीच्या निकालाच्या आधारे 50 गुण मिळणार

– या नव्या मूल्यमापनावरील आधारित निकालावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना, कोरोना संसर्ग संपल्यानंतर दोन वेळा परीक्षेची संधी देता येणार.

– विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकाच्या अध्यक्षेतेखाली 7 सदस्यीय निकाल समिती असणार

– मंडळामार्फत जून अखेर निकाल घोषित करण्याचा प्रयत्न राहणार.