TOD Marathi

Yaas Cyclone : नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्ररित्या केले नुकसानग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 28 मे 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘यास’ चक्रीवादळामुळे ओडीसा आणि बंगालमध्ये झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेत आहे. तसेच मोदी या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठीची बैठक बोलावली होती.

या बैठकीत सुवेंदु अधिकारी यांना ही निमंत्रण दिलं आहे, ज्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी जाहीर केलीय. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील नुकसानीचा आढावा घेतला. मात्र, मोदी आणि ममता बॅनर्जी यांनी वेगवेगळे हवाई सर्वेक्षण केले.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीमध्ये सामील होणार नाहीत. त्यांच्या या कृत्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारमधील अंतर अधिक वाढण्याच्या शक्यता वर्तविली आहेत. ‘यास’ चक्रीवादळासंदर्भात पंतप्रधान मोदींच्या या आढावा बैठकीत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, ममता बॅनर्जी, केंद्री मंत्री देवाश्री चौधरी आणि धर्मेंद्र प्रधान देखील सहभागी होणार आहेत.

याशिवाय विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी सामील होणार आहेत, मात्र, ममता बॅनर्जी यांनी या बैठकीसाठी यायला अर्धा तास उशीर केला. आल्यानंतर त्यांनी चक्रीवादळाच्या नुकसानीसंदर्भातील कागदपत्रे बैठकीत सादर केली. इतर नियोजित बैठका आहेत, असं सांगत त्या निघून गेल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. थोडक्यात, ममता बॅनर्जी यांनी बैठकीस येण्यास नकार दिला आहे.