TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 21 जुलै 2021 – व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने एक नवीन सुपर थँक्स फीचर लाँच केलं आहे. या नवीन फीचरद्वारे युजर्स आपल्या आवडत्या YouTube चॅनेलला टिप देता येईल. हे फीचर व्हिडिओ क्रिएटर्सला पैसे कमविण्यासाठी मदत करणार आहे.

एका निवेदनानुसार, यूट्यूब व्हिडिओ पाहणारे चाहते आता आपले आभार व्यक्त करण्यासाठी आणि समर्थन दाखविण्यासाठी ‘सुपर थँक्स’ खरेदी करू शकतात.

निवेदनात म्हटले आहे की, ” हे अतिरिक्त बोनस म्हणून, त्यांना अ‍ॅनिमेटेड जीआयएफ दिसेल आणि त्यांच्या खरेदीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगळ्या, रंगीबेरंगी टिप्पणीचा पर्याय मिळेल, ज्याचे क्रिएटर्स सहजपणे उत्तर देऊ शकतात.” दरम्यान, सुपर थँक्स फीचर सध्या 2 डॉलर आणि 50 डॉलरमध्ये उपलब्ध आहे.

हे फीचर बीटा टेस्टिंग टप्प्यामध्ये होते आणि आता ते हजारो क्रिएटर्ससाठी उपलब्ध होणार आहे. हे फीचर 68 देशांमधील डेस्कटॉप आणि मोबाइल डिव्हाइस (Android आणि iOS) वर क्रिएटर्स आणि दर्शकांसाठी उपलब्ध होत आहे. काही सूचनांचे पालन करून क्रिएटर्स पाहू शकतात. त्यांच्याजवळ याचा सुरूवातीचा अॅक्सेस आहे की नाही?. जर त्यांच्याजवळ आत्ताचा अॅक्सेस नसेल तर घाबरू नका, आम्ही या वर्षाच्या शेवटी YouTube भागीदारी कार्यक्रमांतर्गत सर्व पात्र क्रिएटर्ससाठी उपलब्धता वाढवित आहोत, असे युट्यूबने म्हटलं आहे.

पैसे कमविण्याची आणखी एक पद्धत :
यूट्यूबचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी सांगितले,युट्यूबवर आम्ही नव्या पद्धतींचा शोध घेत असतो. ज्यामुळे क्रिएटर्स आपल्या उत्पन्नात विविधता आणता येईल.

त्यामुळे मी पेमेंट्सवर आधारित सुपर थँक्स सुरू करण्याबद्दल अतिशय उत्साहित आहे. हे नवे फीचर क्रिएटर्सला पैसे कमावण्याची आणखी एक पद्धत देत आहे. यामुळे दर्शकांसोबत असलेले त्यांचे संबंध दृढ होणार आहेत.

यूट्यूब सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स यासारखी फीचर्सच्या सुविधा आहेत. सुपर चॅट हा हायलाइट केलेला संदेश आहे, जो क्रिएटर्सचे लक्ष आकर्षित करण्यासाठी गर्दीतून वेगळा दिसतो.

तर सुपर चॅट ५ तास चॅटच्या शीर्षस्थानी असते. तसेच, सुपर स्टिकर्स दर्शकांना लाइव्ह स्ट्रीम व प्रीमिअरच्यावेळी क्रिएटर्सकडून स्टिकर विकत घेण्यास अनुमती देत असतात.