TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 जुलै 2021 – आता भारतात टिकटॉक हेही नव्या रूपात पुन्हा परत येणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी टिकटॉकच्या कंपनीने नव्या नावाच्या नोंदणीसाठी अर्ज केलाय.

वर्षभरापूर्वी भारताने काही चिनी अ‍ॅप बंद केले होते. त्यामध्ये पबजी आणि टिकटॉक हे आघाडीवर होते. तसेच ते सर्वाधिक लोकप्रिय झाले होते. सध्या पबजी हे अ‍ॅप पुन्हा परतले असून आता याचे स्वरूप बदलले आहे.

कंपनीने याचे नवे डिझाईन, ट्रेडमार्कसाठी महानियंत्रकसह शॉर्ट-फिल्म व्हिडीओ अ‍ॅपसाठी ट्रेडमार्क दाखल केलाय. याची अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

भारतात टिकटॉकचे 20 कोटी युजर्स होते. या अ‍ॅपमुळे अनेकजण स्टार झाले होते. हे बंद झाल्याचा फायदा इतर अ‍ॅपने घेतला आहे.

भारतात टिकटॉक नव्या आयटी धोरणानुसार काम करणार असून टिकटॉक कंपनी भारतात परत येण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करत आहे.

टिकटॉक बंद झाल्यावर त्याचे सुमारे 20 कोटी युजर्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मकडे वळलेत. त्यामुळे टिकटॉक चाहत्यांसाठी ही नक्कीच आंनदाची बातमी ठरणार आहे.