‘इथल्या’ समुद्रामध्ये लागली आग !; Social Media वर व्हिडीओ Viral, कोट्यवधी Views

टिओडी मराठी, दि. 4 जुलै 2021 – आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करतात. परंतु पाण्यातच आग लागली तर…? आश्चर्य वाटायला नको. होय, मेक्सिकोमधील समुद्रात भीषण आगली लागली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळालेत.

मेक्सिकोकच्या युकाटन भागात शुक्रवारी समुद्रामध्ये आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत होत्या. समुद्रामध्ये ही आग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

परंतु पाण्याखाली असलेली गॅसची पाईपलाईनची गळती झाली आहे, त्यामुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे.

ही आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरूय. ट्विटरवर मॅन्यल लोपझ या युजरने या घटनेचा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर शेअर केलाय.

या व्हिडीओला आतापर्यंत 5 कोटीहून अधिक व्ह्युज मिळालेत. तर, 26 हजार नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

Please follow and like us: