देवेंद्र फडणवीस यांनी माझं ‘ते’ म्हणणं ऐकलं असतं, तर आज CM असते, Ramdas Athavale यांचा गौप्यस्फोट

टिओडी मराठी, मुंबई, दि. 4 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद हुकलं. तर भाजप व शिवसेना यांच्यातील अनेक वर्षांची युतीही तुटली. त्यावेळी झालेल्या सत्तासंघर्षाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माझं ‘ते’ म्हणणं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते.

‘सन्मान देवदूतांचा’ हा विशेष कार्यक्रम मुंबईत झाला. या कार्यक्रमात कोरोनायोद्धयांना सन्मानित केलं. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती होती. यावेळी रामदास आठवले बोलत होते.

यावेळी आठवले यांनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर मिश्किलपणे बोट ठेवलं. ‘त्यावेळी माझं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते’, असे आठवले म्हणाले.

ते सत्तासंघर्षाच्या काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की, शिवसेनेला अडीज वर्ष मुख्यमंत्रिपद देऊन टाका. माझं हे म्हणणं फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असा गौप्यस्फोट आठवले यांनी केलाय.

रामदास आठवले एवढंच बोलून थांबले नाही तर तुमच्या दोघांत एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असेही त्यावेळी म्हणाले, होते, याची आठवणही आठवलेंनी करून दिली.

Please follow and like us: