टिओडी मराठी, दिल्ली, दि. 4 जुलै 2021 – अंमली पदार्थांचा व्यापार ही पोलीस आणि विमानतळ अधिकाऱ्यांसाठी एक आव्हानात्मक बाब असते. असा व्यापार करणाऱ्यांकडून लढवल्या जाणाऱ्या विविध युक्ती, आयडिया पाहून पोलीसही थक्क होतात. असाच काहीसा प्रकार दिल्ली इथल्या विमानतळावर घडला.
दिल्ली विमानतळावर हेरॉईनने भरलेल्या बांगड्या जप्त केल्या. हे पॅकेट आफ्रिकेहून भारतात आलं होतं. दिल्ली विमानतळाच्या कस्टम विभागाला याची कुणकुण लागल्याने त्यांनी साहित्य तपासायला सुरुवात केली.
या साहित्यात एक बांगड्यांनी भरलेला मोठा बॉक्स त्यांना आढळला. तो बॉक्स कुरिअर प्रकारचा होता. त्या बॉक्सला उघडलं तेव्हा त्यात आणखी काही छोटे बॉक्स रचून ठेवलेले आढळले. या कुरिअरवर बांगड्यांचा उल्लेख केला होता.
कस्टम अधिकाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी लगेच तो बॉक्स उघडला. त्यात मण्यांनी बांधलेल्या बांगड्या आढळल्या होत्या. त्या बांगड्यांच्या वरचे मणी काढून टाकले, तेव्हा आत हेरॉईन असल्याचे त्यांना आढळलं. या हेरॉईनची किंमत सुमारे सात कोटी इतकी आहे.
आता कस्टम विभाग हे पार्सल ज्याच्या नावे निघालं होतं, त्याचा शोध घेताहेत. लवकरच त्या व्यक्तिला पकडलं जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
More Stories
‘अग्निपथ’साठी लवकरच राबवली जाणार भरती प्रक्रिया
सुशीलकुमार शिंदे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत? दिल्लीत महत्वाची बैठक
वरुण गांधींचा भाजपला घरचा आहेर; ‘या’ विषयावर केले भाष्य