TOD Marathi

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari)  दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहे. राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना दिल्लीत बोलावण्यात आलेलं आहे, अशी चर्चा आहे. भगत सिंह कोश्यारी दिल्लीत दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं कळलं आहे. २४ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर असे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर राज्यपाल गेले आहे. त्यांच्या महाराजां विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना दिल्लीत बोलवण्यात आलेलं आहे, अशी चर्चा होत आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) दिल्लीत गेल्यावर नेमकं कुणाची भेट घेणार आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे व त्यांना राज्यपाल या पदावरून मुक्त करण्यावर काही पावलं उचलणार आहे का नाही अशी चर्चा चालू आहे. थोड्या दिवसांपूर्वी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपालांनी काही वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)  तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत (Dr. Gadkari) नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी यांनी म्हटले होते. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं करण्यात  आली, आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले(Udayan Raje Bhosle)  यांच्यासह बरेच नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरूद्ध पत्र लिहीलं आहे.

दिक्षान्त समारंभ सोहळ्यात बोलताना राज्यपाल  कोश्यारी म्हणाले होते की, “आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आवडायचे. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्हाला जर कोणी विचारलं तुमचे आवडता हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातच ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय,” असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर नितीन गडकरीपरपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राची सातत्याने राज्यपालांकडून बदनामी होत असल्याची चर्चा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यापुर्वीही असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांकडून झालं आहे म्हणून त्यांना पदावरून काढण्यात येणार असल्याची चर्चा विरोधकांकडून केली जात आहे. त्यात आता राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर गेले अस्ताना पदामुक्त करण्याबाबत काही निर्णय होणार का ? याबाबतही चर्चा रंगली आहे.