TOD Marathi

समुद्राच्या मध्यभागी आगीचा भडका ; Fire विझवण्याचा थरार Camera मध्ये कैद

टिओडी मराठी, मेक्सिको, दि. 13 जुलै 2021 – आपण जमिनीवर कित्येक ठिकाणी आगीच्या घटना घडल्याचं बघितलं असेल. पण, समुद्रामध्ये आग लागल्याची घटना क्वचित ऐकली असणार. मेक्सिकोच्या युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला असलेल्या समुद्रामध्ये ही आग लागलीय. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या प्रायद्वीपच्या पश्चिमेच्या बाजूला समुद्रामध्ये आग लागली. त्या आगीच्या आवाजाने समुद्र किनाऱ्यावर हादरा बसला. पेमेक्स ऑइल प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावर ही आग लागली होती.

त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न केला. ही आग विझवण्यासाठी 5 तासाहून अधिक वेळ लागला, असे मेक्सिकोची सरकारी तेल कंपनी पेमेक्सानं सांगितलं आहे.

पेमेक्सच्या प्रमुख कु मालूब जाप ऑईल डेव्हलपमेंटच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पाण्याखालून ही आग लागली आहे, असे समजते. पाइपलाइनमधून ही आग सुरू झाली, अशी माहिती रॉयटर्सने दिलीय.

ही आग गोलाकार स्थितीत लागल्याने या आगीला स्थानिकांनी आय ऑफ फायर म्हणजेच आगीचा डोळा, असं म्हंटलं आहे.

या दरम्यान, कंपनीने या आगीचं कारण पाण्यातील पाइपलाइनमधून झालेली गॅस गळती आहे, असं सांगितलंय. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. तसेच गॅस गळतीमुळे प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनावरही परिणाम झालेला नाही. मोठी जहाजं आणि हेलिकाॅप्टरच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली आहे.

https://twitter.com/spot_the_lights/status/1411200146054914052?s=20