Selfie काढताना वीज कोसळून 11 जणांचा जागीच मृत्यू ; ‘या’ राज्यातील घटना

टिओडी मराठी, दि. 13 जुलै 2021 – काही तरुण किल्ल्यावर सेल्फी काढत होते, तेव्हा अचानक वीज कोसळली. यात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. हि
घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

जयपूरमध्ये काही तरुण-तरुणी पावसाचा आनंद घेण्यासाठी आमेर किल्ल्यावर गेले होते. तेव्हा वॉच टॉवरवर काही तरुण सेल्फी काढत होते. यावेळी वीज कोसळली. यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण जखमी होऊन दरीत कोसळले.

उत्तर प्रदेशामध्ये प्रयागराज येथे वीज कोसळून सर्वाधिक जीवितहानी झाली. प्रयागराजमध्ये वीज कोसळून दोन लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कानपूरमध्ये दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

फिरोजाबाद जिल्ह्यामध्ये तिघेजण, कोसांबी येथे दोघांचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.

मध्य प्रदेशातही विज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्वालियर, शिवपुरी, बैतुल, होशंगाबाद, रिवा येथे वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी आहेत.

Please follow and like us: