TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 मे 2021 – रामदेव बाबांनी ‘त्या’ विधानावरुन माघार घेऊन ‘ते’ वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केलं. यासंदर्भात उपचार पद्धतीच्या या संघर्षपूर्ण वादाला मी इथे थांबवतो आणि मी केलेले वक्तव्य मागे घेतो, असे रामदेव बाबा यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

देशात करोनाची परिस्थिती गंभीर असताना बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. करोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन निकामी ठरलंय. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही निकामी ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हणाले होते. करोना रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता.

अ‍ॅलोपॅथिक औषधांमुळे झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. या वक्तव्यानंतर डॉक्टर्स आणि संघटनांकडून संताप व्यक्त केला. आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी हि नाराजी व्यक्त केली होती.

बाब रामदेव ट्वीटद्वारे म्हणाले, ”डॉ. हर्षवर्धनजी आपलं पत्र मिळालं. त्यासंदर्भाने चिकित्सा पद्धतीवरील संघर्षाच्या या पू्र्ण वादाला मी विराम देत आहे. मी माझं वक्तव्य मागे घेत आहे. आम्ही अ‍ॅलोपॅथीचे तथा आधुनिक उपचार पद्धतीचे विरोधक नाही. आम्ही हे मान्य करतो की, जीव वाचवण्यासाठी आधुनिक अ‍ॅलोपॅथीने खूप प्रगती केली आहे आणि मानवसेवा केली आहे. माझं जे वक्तव्य कोट केलं आहे, ते मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हॉट्सअ‍ॅपवरील आलेला मेसेज वाचून दाखवलेलं आहे. यामुळे कुण्याच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना पत्र लिहिले होते. यात ‘संपूर्ण देशातील नागरिकांसाठी डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत.

बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावना दुखावणारं आहे. यासंदर्भात केवळ स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपलं विधान जाहीरपणे मागे घ्यायला हवं.’ या पत्राला त्यांनी आज उत्तर दिलंय.