TOD Marathi

करोनामुळे ‘पंतजली डेअरी’ व्यवसायाचे प्रमुख सुनील बन्सल यांचे निधन; रामदेव बाबांच्या ‘त्या’ रामबाण उपायावर कोण विश्वास ठेवणार?

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 मे 2021 – रामदेव बाबा यांच्या ‘पंतजली डेअरी’ व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बन्सल यांचे करोनामुळे निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. करोनाचा संसर्ग फुफ्फुसापर्यंत पोहचल्याकारणाने बन्सल यांची प्रकृती खूप खालावली. यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मागील काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

सुनिल बन्सल यांच्या निधनाची बातमी त्यांच्या नातेवाईकांकडून दिली आहे. याविषयी माहिती देताना मागील काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवलं होतं. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.

सुनिल बन्सल यांनी २०१८ मध्ये पतंजली आयुर्वेदच्या डेअरी व्यवसायाची सूत्रं हाती घेतली होती. बन्सल हे ‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या जाण्याने पतंजली समुहामधून दु:ख व्यक्त केले जात आहे.

रामदेव बाबांच्या ‘त्या’ रामबाण उपायावर कोण विश्वास ठेवणार?
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वांना फटका बसलाय. रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहातील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालीय. विशेष म्हणजे बाब रामदेव यांनी करोना संक्रमणावर रामबाण उपाय शोधून काढण्याचा अनेक वेळा दावा केला. मात्र, त्यांच्याच कर्मचाऱ्यांना करोनाने ग्रासले. त्यामुळे रामदेव बाबा यांच्या ‘त्या’ रामबाण उपायावर कोण विश्वास ठेवणार? असा प्रश्न पडत आहे.