फातिमा शेख यांची आज जयंती, गुगल ने दिली अनोखी आदरांजली.

Fatima Sheikh Google Doodle

शिक्षिका आणि महिलांच्या न्याय, हक्कांसाठी लढणार्‍या फातिमा शेख यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी खास गूगल कडून आज डूडल साकारण्यात आले आहे. आज डूडलवर झळकणार्‍या फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची कवाडं उघडणार्‍या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले  यांचा वरसा फातिमा शेख यांनी पुढे चालवला. 1848 साली दलित मुले आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली.
9 जानेवारी 1831 दिवशी फातिमा शेख यांचा पुण्यात जन्म झाल्ला होता. मुलींची शाळा काढल्यानंतर जेव्हा महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. त्यावेळी उस्मान शेख यांनी त्यांना आश्रय दिला. त्याच उस्मान शेख यांच्या फातिमा शेख या बहिण होत्या.
जात, धर्म, पंथ, लिंग या स्तरावर भेदाभद करत ज्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता त्यांच्यासाठी शेख यांच्या घरी सावित्रीबाई आणि फातिमा शाळा भरवत असत.
‘सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय’ या पुस्तकात एक फोटो आहे, ज्यामध्ये सावित्रीबाईंच्या शेजारी आणखी एक महिला बसली आहे. ही महिला म्हणजेच फातिमा शेख आहेत.
सत्यशोधक चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा सार्‍यांनाच समाजातील उच्चभ्रू लोकांकडून हीन वागणूक देण्यात आली. मात्र अशा परिस्थितीमध्येही घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून त्यांना शाळेत पाठवण्यासाठी फातिमा शेख स्वतः प्रयत्न करत होत्या.
भारत सरकारने फातिमा शेख यांच्या कार्याची दखल घेत 2014 साली उर्दू पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. देशात शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींमध्ये फातिमा शेख हे नाव देखिल तितक्याच ठळकपणे घेतले जाते.
सावित्रीबाईंच्या अनुपस्थिती शाळेची जबाबदारी फातिमा यांनी समर्थपणे सांभाळली. फातिमा या सावित्रीबाईंच्या मैत्रीण आणि सहकारी होत्या. त्यांना स्वतःचं अस्तित्व होतं आणि सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने आपल्या डुडलद्वारे त्यांचा सन्मान केला आहे.

Please follow and like us: