TOD Marathi

सध्या महाराष्ट्रात शिवसेना अपात्र सुनावणी पार पडत आहे. यामध्ये उबाळा गटातील प्रतोद सुनिल प्रभु यांची उलटतपासणी पार पडत आहे. एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडी वरून सुनावणी दरम्यान वाद रंगला आहे. यावेळी मात्र एक डायरी आणि शिंदेंचाई-मेल आयडी महत्त्वाचा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटाने ई-मेल संदर्भात करण्यात आलेल्या आरोपावर उत्तर दाखल करण्यात आलंय. आम्ही मेल पाठवलेला ईमेल आयडी हा एकनाथ शिंदे यांचा खरा ईमेल आयडी जो विधानसभा सदस्यांच्या यादी पुस्तिकेत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

सुनावणी दरम्यान हा एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडीच अस्तित्वात नसल्याचा शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी दावा केला होता. शिवाय 2023 च्या पुस्तिकेमधील आमदारांच्या माहितीचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा वेगळा असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे.