TOD Marathi

रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. अनेक लोक चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. १ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र आता चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सेन्साॅर बोर्डने कात्री फिरवली आहे.

सेन्सॉरने ‘ए’ सर्टिफिकेट दिलेलं असूनसुद्धा या चित्रपटातील ५ ठिकाणी सेन्सॉरने कात्री चालवली आहे. चित्रपटाच्या १ तास ३१ मिनिटाला येणाऱ्या संवादातील ‘ब्लॅक’ हा शब्द हटवण्यात आला आहे. तर पुढील एका संवादातील ‘कॉस्च्युम’ शब्दाऐवजी ‘वस्त्र’ हा शब्द वापरण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच सबटायटलमधील ‘You change pads four times a month’ हे वाक्य काढून टाकण्यास सांगितले आहे. शिवाय चित्रपटात जिथे शिवीगाळ करण्यात आला आहे तिथेही काही बदल सुचवण्यात आले आहेत.या चार बदलांबरोबरच आणखी एक पाचवा अन् मोठा बदल करण्यात आला आहे. रणबीर आणि रश्मिका यांच्यात चित्रित केलेल्या एका इंटीमेट सीनचा एक क्लोज-अप शॉट काढण्यात आला आहे.