सध्या महाराष्ट्रात मराठा विरूद्ध ओबीसी वाद वाढतानाचं दिसत आहे. मराठे नेते जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचा वाद तर सर्वश्रुत आहे. अशातच छगन भुजबळ मराठा समजाचं नेतृत्व करत असताना. राज्यातून आणि सरकारमधून त्यांच्यावर टिका देखील होत आहे. अशातच एक गोष्ट घडली आहे .
येवला तालुक्यातील नुकसान पाहणी करून भुजबळ निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले होते. यावेळी भुजबळांचा ताफा लासलगाव कोटमगाव मार्गे जात असताना कोटमगाव येथे मराठा समाजाच्या कार्यकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले. तसेच ताफा पुढे गेल्यानंतर आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणा देखील दिल्या होत्या.
मराठा आंदोलकांनी भुजबळांचा ताफा जाताच गोमुत्र शिंपडून निषेध नोंदवला. मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे भुजबळांनी त्यांच्या दौऱ्यात बदल केला.