TOD Marathi

काल अजित पवार गटाची मंथन शिबीर कर्जत इथं पार पडलं.यावेळी अजित पवार गटाने शरद पवार गटावर मोठ्या प्रमाणात टीका केली. अनेक गौप्यस्फोट केले. याबद्दल आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिल्याचं पहायला मिळालं. प्रफुल्ल पटेल नेहमीच पुस्तक लिहणार म्हणत असतात असं पत्रकारांनी विचारलं असता पवार म्हणाले

” मी त्यांचं पुस्तक कधी येतंय याची मी वाट पाहतोय. त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी त्यावर पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी एक प्रकरण अलिकडे लोक पक्ष सोडून का जातात यावर लिहावं. त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असं ऐकलंय. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावं.”