TOD Marathi

काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. जालनामध्ये हा प्रकार घडला.जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. यादरम्यानच हा हल्ला घडला. अज्ञातांनी कारच्या समोरील काचेवर दगडफेक केली. तसेच, कारवर ऑइलही फेकलं आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले “आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक होती. निवडणूक बिनविरोध होण्याची प्रक्रिया पार पडत होती. मात्र, काही असंतोष लोकांनी मुद्दामहून गाडीवर दगड मारले. ज्यात गाडीची काच फुटली आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. तसेच, ज्यांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे”