TOD Marathi

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते पुणे शहरातील अनेक विकास कामांचे उद्घाटन करणार होते. परंतु त्यांचा हा दौरा अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती समोर मिळाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आल्याची माहिती आहे.

पुणे दौऱ्यावर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होतं. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी देखील सुरू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने covid-19 रुग्णात वाढ होत आहे. त्यामुळे अखेर हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

28 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाच कलादालन, पुणे महापालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार होतं. तसेच नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.