TOD Marathi

पुणे: सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाई बाबत माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली करत नवा रेकॉर्ड केला आहे. भारतात चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे.
कोरोना काळातही या चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धी पाहता या चित्रपटाचे विविध पैलूही तितकीच लोकप्रियता मिळवून गेले.
सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या मध्यवर्ती भूमिका पाहायला मिळत आहेत. अॅक्शन ड्रामाचे फॉरेस्ट व्हिज्युअल आणि मूड उत्तम प्रकारे हायलाइट केल्यामुळे मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांचे उत्कृष्ट कॅमेरा-वर्क केले आहे. देवी श्री प्रसादचे संगीत अव्वल दर्जाचे आहे. कारण सर्व गाणी उत्कृष्ट आहेत आणि चांगली चित्रित देखील आहेत. डीएसपीने डाकको डाकको मेका आणि सामी सामी सारखी हिट गाणी दिली आहेत. चंद्र बोस यांचे गीत अप्रतिम आहेत. रेसुल पुकुट्टीने चित्रपटाच्या साउंड डिझाइनवर काम केले. अल्लू अर्जुननं या चित्रपटामध्ये साकारलेली भूमिका आणि त्याला मिळालेली तगड्या कथानकाची जोड ही ‘पुष्पा’च्या जमेची बाजू ठरत आहे. फक्त अल्लू अर्जुन नव्हे, तर रश्मिका आणि इतर सहकलाकारांनीही या चित्रपटामध्ये तितक्याच ताकदीनं त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका साकारल्या आहेत.
विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कामगिरीनंतर आता निर्मात्यांनी तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेव्हा आता ज्यांना हा चित्रपट पाहता आलेला नाही, त्या सिनेरसिकांसाठी ही परवणी ठरणार आहे. 7 जानेवारीला  ‘पुष्पा: द राइज- पार्ट 1’ हा चित्रपट Amazon Prime या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला.
पुष्पा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरता लागली आहे. तर या चित्रपटाचा दुसरा भाग 17 डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.