TOD Marathi

आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतला निर्णय

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 21 मे 2021 – भारत सरकारकडून देशातील इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस कडून वित्तीय वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. केंद्र सरकारकडून सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात येत आहे.

वैयक्तिक कर भरणारे सर्वसामान्य नागरिक आता 30 सप्टेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 119 नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवून दिलीय. या अगोदरही इन्कम टॅक्स विभागाने त्यांच्याशी संबंधित इतर कर भरण्यासाठी मुदत वाढ दिली होती.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून कंपन्यांना हि इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढ दिलीय. कंपन्या एक महिन्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. सर्वसामान्य नागरिकांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. कंपन्यांना मात्र एक महिन्यांची मुदतवाढ दिलीय.

आता कंपन्या 30 नोव्हेंबरपर्यंत मागील वर्षीचा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार आहेत. सर्वसाधारणपणे नेहमी 31 ऑक्टोंबरला मागील वित्त वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न कंपन्यांना भरावा लागतो, यंदा 30 नोव्हेंबरपर्यंत भरू शकतात.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा फार्म 16 भरणं गरजेचे असते. आता हा फॉर्म भरण्यासाठी हि एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता कोणतीही कंपनी 15 जुलैपर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांचे फॉर्म 16 भरू शकणार आहे.

टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि ट्रान्सफर प्राईसिंग सर्टिफिकेट भरण्यासाठी हि एक महिन्याची मुदतवाढ दिलीय. आता हा टॅक्स ऑडिट रिपोर्ट व सर्टिफिकेट 31 ऑक्टोंबरपर्यंत भरू शकतील.

लेट रिवाईज इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदतही वाढवली आहे. त्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 ही असणार आहे. वित्तीय संस्थांसाठी फायनान्शिअल ट्रांजेक्शन स्टेटमेंट भरण्यासाठीचीही मुदत 30 जूनपर्यंत वाढवली आहे. अगोदर ही मुदत 31 मे पर्यंत होती.