TOD Marathi

येत्या दीड वर्षांत १० लाख जणांची सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. हे काम मिशन मोडमध्ये करण्यात येणार आहे. (PM Modi on Government Jobs) सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.

आज सकाळी पीएमओ कार्यालयाकडून यासंबंधी ट्वीट करण्यात आलं आहे. सदर ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील १.५ वर्षांत मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असतात. राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षाचे नेतेही मोदींवर बेरोजगारीच्या मुद्द्यावर हल्लाबोल करत असतात.

एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी विविध सरकारी विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला प्रथम प्राधान्य देण्यास सांगितलं होतं. तर, फेब्रुवारीमध्ये राज्यसभेत सादर केलेल्या सरकारी आकड्यांनुसार १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारमधील विभागात ८७ लाख पद रिक्त आहेत.