यंदाही सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर, घरगुती बाप्पा 2 फुटचा असणार ; State Government ची नियमावली जारी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 जून 2021 – कोरोनामुळे यंदाही यंदाही सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर, घरगुती बाप्पा 2 फुटचा असणार आहे. याबाबत राज्य सरकारची नियमावली जारी केली आहे. गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. 

तत्पूर्वी राज्यातील मूर्तीकारांनीही महाविकासआघाडी सरकारकडे तातडीने गणेशोत्सवाबाबत धोरण जाहीर करावे, अशी मागणी केली होती. रेश्मा खातू यांनी याबाबत मूर्तीकारांची बाजू मांडली.

गणेशोत्सवाला आता दोन महिने उरलेले असताना मूर्तीकार चिंतेत आहेत. कारण, कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप राज्य सरकारकडून न मिळाल्याने उंच गणेशमूर्तींचे काम मूर्तीकारांनी सुरू केलेले नाही. त्यामुळे याबाबत स्पष्टता सरकारने द्यावी, जेणेकरून मूर्तिकारांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल.

मूर्तीकारांप्रमाणे हाच संभ्रम मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळामध्ये सुद्धा होता, असे रेश्मा खातू यांनी म्हटले .

यंदाच्या गणेशोत्सव दरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नयेत, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जात आहे.

मागील वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी. अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून दिल्या होत्या. मात्र, यंदा अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नयेत, अशी विनंती केली जातेय.

 • गणेशोत्स साजरा करण्याबाबत ह्या आहेत मार्गदर्शक सूचना :
 • गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे गरजेचे.
 • कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
 • सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट तर घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी
 • विसर्जन कृञिम तलावात करावे,
 • शक्यतो शाडूच्या मूर्ती ठेवावी.
 • नागरिक देतील ती वर्गणी कार्यकर्त्यांनी स्विकारावी.
 • मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
 • सांस्कृतिक उपक्रमापेक्षा आरोग्य कार्यक्रम राबवावेत
 • आरती, भजन, किर्तन दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
 • नागरिकांची गर्दी होऊ नये, या अनुषंगाने गणेशचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
 • गणपती मंडपात निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करावी.
Please follow and like us: